50 कोटींहून अधिक भारतीय युजर्स असलेले व्हॉट्सअॅप सध्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या यादीत 'पिन टू टॉप' आहे. प्रायव्हसी पॉलिसीमुळे WhatsApp आणि मेटाची बाजारपेठेत एकाधिकारशाही निर्माण झाली असून या धोरणामुळे प्रतिस्पर्धी कंपन्याचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष CCI ने काढला आहे.
WhatsApp ने CCI समोरील सुनावणीत हा दावा फेटाळून लावला आहे. CCI च्या नियमावलीनुसार WhatsApp ला जागतिक स्तरावरील उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. त्यामुळे CCI आता काय निकाल देणार याकडे देशभराचं लक्ष लागले आहे.