सुनील चावके
मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून निर्णायक अधिकार किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळातही होते. राहुल गांधी यांनी अधिकार आपल्याकडेच ठेवलेले असल्याचे वेगवेगळ्या घटनांत दिसले. असे असूनही ऐन निवडणुकांच्या काळात पक्षहित धाब्यावर बसविणाऱ्या राज्याराज्यांतील नेत्यांना त्यांना वेसण घालता आलेली नाही.