चकोर गांधी
आपण अनेकदा अगदी सहजपणे टर्नओव्हर, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, मार्जिन असे शब्द वापरतो आणि अतिशय मोघमपणे त्याची आकडेवारीही सांगितली जाते. मात्र, ही सर्व आकडेवारी अचूक काढणे गरजेचे असते.
टर्नओव्हर, ग्रॉस प्रॉफिट वीस पंचवीस टक्के, नेट प्रॉफिट दहा-पंधरा टक्के असे मोघमपणे काढणे व्यवसायाच्यादृष्टीने योग्य नाही. कारण अगदी एक, दोन किंवा पाच टक्क्यांचा फरकही खूप मोठा असतो.
टर्नओव्हर म्हणजे निव्वळ करविरहित विक्री असते, तर ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा विक्रीवर काढला जातो. त्यामध्ये स्टॉक ओपनिंग व क्लोजिंग फिगर असते. एकूण स्टॉकची किंमत काढताना दोन्हीकडे लॅंडेड म्हणजे घरात पडलेली असते.
त्यानंतर नेट प्रॉफिट काढले जाते. त्यामध्ये सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च असतात. अलीकडच्या काळात नफा हा विक्रीत नसून, खरेदीत आहे म्हणजेच आपल्या उत्पादनाच्या कॉस्टिंगवर अवलंबून आहे.
त्यामुळे टर्नओव्हर, ग्रॉस प्रॉफिट वीस-पंचवीस टक्के, नेट प्रॉफिट यांची अचूक आकडेवारी काढणे अतिशय महत्त्वाचे आहे.