संजीव मोघे
टोकनायझेशन तंत्रज्ञान तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील एका डिजिटल अभिज्ञापकाने (आयडेंटिफायर) बदलते, ते म्हणजे एक टोकन. हे टोकन विविध देयक मंचावर (पेमेंट प्लॅटफॉर्म) देयक सुरक्षितता सुनिश्चित करून, तुमच्या वास्तविक कार्ड तपशीलांऐवजी व्यवहारांमध्ये वापरले जाते.
ऑनलाइन खरेदी असो, पेमेंट गेटवेद्वारे देयक प्रदान करताना किंवा संपर्करहित पेमेंटच्या वेळी ही टोकन तुमच्या आर्थिक डेटाचे रक्षण करतात. तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकन करणे अनिवार्य नाही. परंतु, हे योग्य आहे, कारण ते तुमच्या कार्ड तपशीलांसाठी संरक्षण म्हणून काम करते.