वसंत कुलकर्णी
जागतिक स्तरावर लोकसंख्येचा विचार करता चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारताच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी अर्धी म्हणजे ५० टक्के लोकसंख्या तरुण म्हणजे २९ वर्षांच्या आतील आहे.
म्हणजे जागतिक स्तरावर सर्वांत तरुण लोकसंख्या असणारा आपला देश आहे.
कमावत्या वयातील (वय वर्षे १८ ते ६०) सर्वाधिक लोकसंख्या भारतात असल्याने भारत हा ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ (तरुण लोकसंख्या असल्याचा फायदा) तयार करणारा देश समजला जातो. भारताच्या अनोखा ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा फायदा आजच्या गतिमान बदलत्या जगात मोठ्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देतो.