ॲड. प्रतिभा देवी
भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती दर दोन महिन्यांनी पतधोरण जाहीर करते, तेव्हा सर्वांचे लक्ष रेपोदराकडे लागलेले असते.
पतधोरणात रेपोदर वाढणार, कमी होणार की स्थिर राहणार... यावर कर्जदारांचा मासिक कर्जहप्ता कमी होणार, वाढणार की आहे तोच राहणार, हे ठरते. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपोदर, सीआरआर हे शब्दही यावेळी कानावर पडतात.
मात्र, अनेकांना त्याचा अर्थ आणि त्यामुळे आपल्या जीवनावर होणारा परिणाम यातील संबंध माहित नसतो. रेपोदर आणि रिव्हर्स रेपोदर याचा अर्थ आणि त्यातील बदलाचे परिणाम जाणून घेणे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे.