कौस्तुभ केळकर:
आजचा काळ हा डिजिटायझेशनचा आहे. आजकाल आपण बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करतो. आता रोख पैसे नसले, तरी अडत नाही. मोबाईलवरून एका क्षणात पैसे दिले जातात. कागदपत्रे ऑनलाइन पाठविता येतात. यामुळे व्यवहारात सुलभता आली असली, तरी फसवणुकीचे प्रकारही वाढल्याचे दिसून येते. आजकाल दररोज सायबर गुन्ह्यांच्या घटना ऐकायला मिळतात. त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लोकांनीही अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.