Indian Gift Market Survey: भारतात भेटवस्तूंशिवाय सण साजराच होत नाही. त्यामुळेच सणासुदीचे दिवस आले की बाजार ओसंडून वाहायला लागतो. पण तुम्हाला माहितीय का, आपण भेटवस्तूंवर खरंच किती खर्च करत असतो. एका सर्वेक्षणानुसार आत्तापर्यंत आपण १.२ लाख करोडचा खर्च केलाय आणि यानंतर आणखी १.८५ लाख करोडच्या वर हा खर्च जाणारे.
लोकलसर्कल्स या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक इंटरेस्टिंग सर्वेक्षण केलं आहे. आपण भेटवस्तूंवर किती खर्च करतो, मिठाया, फराळ, स्वयंपाकघरातील साधनं, दिवे, मेणबत्त्या अशा कोणकोणत्या गोष्टींवर किती टक्के यातला खर्च जातो? ऑनलाइन खरेदी की ऑनलाइन पेमेंट? शहरात खरेदीचा ट्रेंड काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सर्वेक्षणातून मिळतायत.