बाल्टीक समुद्रातला एक डॉल्फीन मासा दिवसरात्र अनेक आवाज काढत असतो, शिट्ट्या वाजवत असतो; एकूण डॉल्फिन संवादासाठी जी जी माध्यमं वापरतात ते सगळं करतो
पण गंमत अशी की त्याच्याशी संवाद साधायला, समोर, इकडे, तिकडे पाण्यात कुणीच दुसरा डॉल्फीन नाहीये.
या माशाला एकटं वाटतंय का? तो असे आवाज करून कोणाशी संवाद करण्याच्या प्रयत्नात आहे, असा प्रश्न संशोधकांना पडलाय.