US Citizenship: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतीयांचं ‘अमेरिकन ड्रीम’ भंगणार?
Donald Trump On US citizenship
नवी दिल्ली : अमेरिकेत नोकरी, धंद्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना तिथे मुलांना जन्म देणं, हा नागरिकत्त्व मिळण्यासाठीचा एक हमखास मार्ग होता. मात्र अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनांनी आणि प्रस्तावित धोरणांनी अनेक भारतीयांच्या अमेरिकन ड्रीम्सला सुरुंग लावलाय.
अमेरिकेतही स्थानिक विरुद्ध उपरे अशा संघर्षाची छाया दिसू लागताच ट्रम्प यांनी प्रचारासाठी हा मुद्दा सहज पकडला आणि आश्वासन दिलं की, अमेरिकेवर पहिला हक्क अमेरिकनांचाच असेल.
याचा गर्भितार्थ होता, 'अमेरिकेतल्या मूळ नागरिकांचा. बाहेरून आलेल्या नव्हे.'
या बाहेरच्यांना हुसकावून अमेरिकेला पूर्वीसारखं स्थान प्राप्त करण्याकडे ट्रम्प आणि समर्थकांचं पहिलं पाऊल म्हणजे नागरिकत्त्वाविषयक नियमांचं एक नवं प्रस्तावित धोरण.
काय आहे हे धोरण?
यातले नियम भारतीयांसाठी जाचक असतील का?,
खरंच या धोरणामुळे अमेरिकेतल्या अनिवासी भारतीयांची आणि त्यांच्या कुटुंबाची गच्छंती होईल?