किरांग गांधी
भारतातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा गेल्या कित्येक वर्षांपासून गुंतवणुकीचा अत्यंत आवडता पर्याय आहे.
प्रामुख्याने ज्या गुंतवणूकदारांना निवृत्तीनंतर निश्चित आणि स्थिर परतावा अपेक्षित असतो, त्यांच्यासाठी हा आकर्षक पर्याय असतो.
स्थिर परताव्याची शाश्वती आणि पैसा बँकेत ठेवलेला असल्याने तो सुरक्षित असल्याची भावना या दोन गोष्टींमुळे हा पर्याय भारतीय गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे.
परंतु, आपल्या गुंतवणुकीवर होणारा महागाईचा गंभीर; पण सहज लक्षात न येणारा परिणाम समजून घेण्यात हे गुंतवणूकदार कमी पडतात.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे छुपे धोके समजून घेणे गरजेचे आहे. एका काल्पनिक उदाहरणाच्या मदतीने आपण ‘एफडी’मधील गुंतवणुकीवर महागाईचा नक्की काय परिणाम होतो, हे जाणून घेऊ या.