गोंदण कलेतील नवे तंत्रज्ञान; इलेक्ट्रिक टॅटू
टॅटू हा शब्द मूळ टॅटॅव या शब्दावरून आला. याचा अर्थ "टू मार्क' म्हणजे "खूण किंवा निशाणी उमटवणे' असा होतो. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी गोंदण काढण्याची प्रथा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. इजिप्तच्या थडग्यांमधील जतन केलेल्या काही मृतदेहांच्या त्वचेवरही गोंदण केलेले आढळून येते. गोंदण करण्याकरिता वापरण्यात येणारी शाई ही हिरव्या, निळा, काळा, लाल, पिवळा यापैकी कोणत्याही रंगाची असते. ही शाई एका सुईच्या किंवा यंत्राच्या मदतीने त्वचेच्या खालच्या थरामध्ये सोडली जाते. विविध प्रकारची चित्रे, नावं, देवीदेवतांच्या प्रतिकृती आदी गोंदवून घेतल्या जातात.
सौंदर्य खुलवणाऱ्या गोंदणात आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पाश्चात्य देशात इलेक्ट्रिक टॅटूचा उदय झाला अन् गोंदण तंत्रज्ञानला अधिक गती आली. इलेक्ट्रिक टॅटूच्या साह्याने अनेक लोक शरिराच्या अनेक भागावर गोंदण करुन घेत आहेत. त्वचेची दाह न होणारे, न दुखणारे, कोणताही साईड इफेक्ट न होणारे हे तंत्रज्ञान आहे. सोशल मीडियावर असे टॅटू कसे तयार केले जातात, याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. आता असे तंत्रज्ञान वापरणारे अनेक कलाकार पुढे आले आहेत. टॅटूची कला ही भारतात प्राचीन काळापासून आहे. तरीही असे नवीन तंत्रज्ञान वापरुन भारतातील टॅटू कलाकार ही पुढे असणार आहेत, हे नक्की. नव तंत्रज्ञान नेमकं काय आहे? चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली चांदर गोंदणी, हे "सर्जाराजा' चित्रपटातील गाणं तुम्ही ऐकलं असेल. होय ना? चला, तर मग जाणून घेऊ या...!