सौरव बसू
आर्थिक वर्षाखेरीस जेव्हा करबचत करण्याची वेळ येते, तेव्हा अनेक करदाते म्युच्युअल फंडाच्या इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक करतात.
अधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता आणि तुलनेने कमी लॉक-इन पिरियड यामुळे करदाते ‘ईएलएसएस’कडे आकर्षित होतात.
करबचत करणारे म्युच्युअल फंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ईएलएसएस’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत करवजावटीचा लाभ मिळतो.
‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय स्वीकारून जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची करवजावट मिळवता येते.