दीपा कर्माकरला जेव्हा प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी सरांनी हे म्हटले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर काही क्षणासाठी अंधारी आली. इतकी वर्ष ज्या खेळावर मनापासून प्रेम केलं, ज्याच्यासाठी जिवाचं रान केलं, संकटांवर मात केली, प्रचंड मेहनत घेतली आणि आता अचानक त्या खेळापासून दूर व्हावं लागतंय, या विचाराने दीपाला हतबल केलं. ती ढसाढसा रडली. 'सरजी फिर एक बार आप सोचिए, मै और २-३ साल खेलना चाहती हू' अशी विनवणी तिने नंदी सरांकडे केली. दीपाला हे असे सांगणे हे त्यांच्यासाठीही खूप अवघड होते,परंतु त्यामागे ठोस कारण असल्याशिवाय ते तिला असं सांगणार नाही.