सुधाकर कुलकर्णी
आर्थिक व्यवहारातील वाढत्या डिजिटल सुविधांमुळे चांगली सोय झाल्याने सर्वसामान्य लोकदेखील सर्रास आपले आर्थिक व्यवहार सहजपणे डिजिटल पद्धतीने करू लागले आहेत. यासाठी प्रामुख्याने नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, गुगल पे, फोनपे, भीम यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर केला जातो.
यामुळे आर्थिक व्यवहार रोख रकमेत न होता थेट बँकेमार्फतच होतात. त्याचा उपयोग काळ्या पैशाच्या वाढीला आळा घालण्यासाठी होत आहे. ही जमेची बाजू असली, तरी अशा डिजिटल व्यवहारांत होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
हे व्यवहार बँक खात्यामार्फत होत असले, तरी फसवणूक झालेल्या व्यवहारातील प्रत्यक्ष लाभार्थ्याची ओळख पटविणे खूप अवघड असते; तसेच अशा गुन्ह्यातील दोषींपर्यंत पोचणे तपास यंत्रणांना अवघड असते, कारण अशा फसवणुकीच्या व्यवहारात ‘मनी म्यूल’चा सहभाग असतो. हे ‘मनी म्यूल’ म्हणजे काय?
एखादी व्यक्ती ‘मनी म्यूल’ कशी होते व त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे जाणून घेऊ या.