शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी कंपन्या प्राथमिक समभाग विक्री योजना अर्थात ‘आयपीओ’ आणतात. अशा ‘आयपीओ’मध्ये शेअरची किंमत निश्चित केलेली असते. शेअर बाजारात नोंदणी होताना, त्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांना अगदी अल्पावधीत भरभक्कम नफा मिळवण्याची संधी मिळत असल्याने ‘आयपीओ’मध्ये पैसे गुंतविण्यावर अनेकांचा भर असतो. काहीवेळा उलटेही घडते. त्यामुळे ‘आयपीओ’मध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेताना, कोणते पथ्य बाळगावे, याबाबतची ही सल्लामसलत...