Father Daughter Relationship, Emotional Bond - तुमच्या सोबत असं बरेचदा झालं असेल ना, की दरवाजाची बेल वाजवण्याआधी अचानक आज चॉकलेट आणलं नसल्याचे आठवत आणि लगेच तसेच माघारी फिरून दुकान गाठता... ऑफिसमधून रोज दमूनभागून येणारे आपण, आता घरी येताच थकवा विसरून जातो, कारण एक इवलीशी परी आपली घरी वाट बघत असते... कधी एकदा बाबा घरी येतो आणि मी त्याला बिलगते, अशी तळमळ तुमच्याही लेकीची तुम्हाला दिसत असेलच... तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहण्यासाठी कधी एकदा घरी पोहोचतो, असं प्रत्येक लेकीच्या बापाला वाटत असेलच... लेक झाल्यावर आपलं आयुष्यात झालेले हे बदल क्वचितच आपण टिपले असतील...