विशाखा बाग, gauribag7@gmail.com
सोने हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शुद्ध सोने, सोन्याचे दागिने यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला दिसतोच. मात्र, या पारंपरिक गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा आधुनिक, अधिक सुरक्षित मार्गही उपलब्ध आहेत.
कमी खर्चात अधिक परतावा देणारे ‘गोल्ड ईटीएफ’ किंवा ‘गोल्ड बाँड’ असे पर्याय उपलब्ध आहेत. अडीअडचणीला हाताशी असावे, हा दृष्टिकोन या पर्यायांमध्येही ठेवता येतो. कारण यातून मिळणारा परतावा गरजेच्या वेळी काढूनही घेता येतो.
म्हणून भारतीयांनी आता सोन्यातील गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांविषयी शिक्षित होण्याची गरज आहे.