ॲड. प्रतिभा देवी
आपल्या देशात २०१७ मध्ये वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायदा लागू झाला. संशोधित करप्रणाली हे त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
याचे तीन प्रकार आहेत ‘एसजीएसटी’, ‘सीजीएसटी’ आणि ‘आयजीएसटी’. ‘जीएसटी’अंतर्गत येणारे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ अर्थात ‘आयटीसी’ हे करव्यावसायिकांच्या फायद्याचे ठरते.
करपात्र व्यक्तीने कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या खरेदीवर भरलेला कर म्हणजे ‘आयटीसी.’ त्याच्या परताव्याच्या अटींची पूर्तता केल्यास भरलेल्या कराचा परतावा मिळू शकतो.