मुलांच्या शाळेच्या व्हॉट्सअपग्रूपवर अनेक गोष्टी पडत असतात. नुकतंच काही ठिकाणी शाळांनी HFMD या आजाराविषयक माहिती पाठवली आणि तुमच्या मुलाला संसर्ग झाला असेल तर थोडे दिवस घरीच विश्रांती द्या, असं सांगितलं.
मात्र माहितीच्या या महाविश्वात या आजाराबद्दलच्या ऐकीव माहितीने पालकच घाबरून गेलेत. काय आहे हा आजार? लक्षणं आणि काळजीचं कारण खरंच आहे का?