प्रसाद भागवत
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’ या गीतोपदेशाप्रमाणे प्रत्येक कर्म निष्काम हेतूने करायला जमणार नसले, तरीही काही खर्चांचे ‘फल’ न मिळालेलेच चांगले असते.
आपल्या आरोग्यासाठी करण्यात आलेल्या तपासण्यांबाबत असे घडणे आपल्याच फायद्याचे असते. काही जण मात्र, झालेल्या खर्चाचा विचार करतात.
असाच विचार ते आरोग्य विम्याबाबत करतात. विम्याचा हप्ता भरला, तर तो वाया जाणार मग कशाला हा विमा घ्यायचा, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
मात्र, कपड्यांच्या साबणाच्या ‘दाग अच्छे है’ या अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातीच्या चालीवर, दिलेले काही खर्च वसूल न झालेलेच उत्तम असते.