अमिताभ जैन
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या जगात मिलेनियल्स (१९८१-१९९६ या काळात जन्मलेल्या), जेनझी तरुणाई (१९९७-२०१२ या काळात जन्मलेल्या) चांगलं यश मिळवत आहे.
भौतिक सुखोपभोगाकडे कल वाढत आहे, त्यासाठी प्रचंड खर्च केला जात आहे. मात्र, यात आरोग्य आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
सुखोपभोगावर होणाऱ्या खर्चामुळे आरोग्यदायी जीवन असुरक्षित होत आहे. हे लक्षात घेऊन या पिढीने विशेषतः मुलींनी, वयाच्या तिशीच्या आतच आरोग्य विमा घेऊन आपल्या आरोग्यासाठी योग्य तरतूद करणे गरजेचे आहे.