तुमचं एखादं दुकान आहे, तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर जाहीर करता. हे बघून बाजूचा दुकानदारही ऑफर जाहीर करतो, ही स्पर्धा वर्षानुवर्षे सुरू असते. आता ग्राहकांच्या गरजा बदलल्या, त्यानुसार दुकानात नवीन मालही भरावा लागणार, त्यासाठी आणखी जागा लागेल. पण यासाठी तुमच्या खिशात पुरेसे पैसे नसतील. तुमच्या बाजूच्या दुकानदाराचीही हीच अवस्था असते. शेवटी दोन्ही दुकानदार ‘ऑफर’चा वर्षाव थांबून मार्केट रेटनुसार माल विकायचे ठरवतात... अशीच अवस्था देशातल्या टेलिकॉम क्षेत्राची झाली होती.
अखेर जुलैमध्ये जिओ, एअरटेल, VI (व्होडाफोन- आयडिया) या दिग्गज कंपन्यांनी पोस्टपेड आणि प्रीपेड प्लानमध्ये दरवाढ जाहीर केली. पण कंपन्यांवर ही वेळ का ओढवली आणि याचा तुमच्या खिशावर किती भार पडणार हे जाणून घेऊया..