सध्या शेअर बाजार नवनवे उच्चांक नोंदवत असल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आपल्या देशात दोन मुख्य शेअर बाजार आहे. एक म्हणजे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई). ‘बीएसई’ देशातील सर्वांत जुना शेअर बाजार असून, जुलै महिन्यात तो १५०व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त या शेअर बाजाराच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून घेऊ या.