2026 Commonwealth Games (CWG) - ग्लासगो येथे २०२६ मध्ये होणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चर्चेत आली आहे, कारण या स्पर्धेतून काही महत्त्वाचे खेळ वगळण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, क्रिकेट आदी खेळ वगळण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळे भारतीय क्रीडा प्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी तर भारताने या स्पर्धेवर बहिष्कार टाकावा असे म्हटले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते खेळ असावे, कोणते नसावे, याचा निर्णय कोण घेतं? खेळांच्या संख्येवर काही मर्यादा आहे का? ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी घेतला गेलेला निर्णयाचा भारताला फटका कसा? या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया...