प्रसाद घारे,
prasad.ghare@gmail.com
जगाच्या आर्थिक पटलावर भारतीय अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर विराजमान असून, भारतीय अर्थव्यवस्थेचा रथ साधारणपणे सात ते साडेसात टक्के दराने पळत आहे.
येत्या काही वर्षांत तो जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास जगभरातील अर्थविषयक अभ्यासक, संशोधक व्यक्त करीत आहेत. या वाढीत कृषी, सेवा, उत्पादन, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा मोठा वाटा आहे.
त्याचवेळी भारतातील मंदिरे आणि त्यांच्याभोवती फिरणारे अर्थकारण याचेही योगदान मोलाचे ठरणार आहे.