''हे सांगायला फार अवघड जातंय, पण मी झोपले असताना कुणीतरी माझं चुंबन घेत आहे, असं मला दोन दिवस जाणवलं. मला आधी वाटलं की स्वप्नंच पडतंय मला. पण दोन दिवस एकच स्वप्न कसं पडेल. मग मी थोडी सावध झाले. तिसऱ्या दिवशीही मला तेच वाटलं पण मी पटकन डोळे उघडले तर डोळ्यासमोर मला माझा मुलगा दिसला. तो सोळा वर्षांचा आहे. मी डोळे उघडल्यानंतर तो धावत जाऊन त्याच्या खोलीत झोपला. मी तिथे जाऊन पाहिलं तर तो गाढ झोपेत असल्यासारखं दाखवत होता. मला हे फार विचित्र वाटलं.
माझा मुलगा माझ्याच प्रेमात पडला आहे का?
मी खूप घाबरले आहे. मी काय करावं? तो बाकी चांगला आहे. अभ्यास वगैरे करतो. आमचं ऐकतो. खेळकर आहे, पण सध्या काही दिवस मला थोडे वेगळे जाणवले. मी काय करावं??''