किरांग गांधी:
दीर्घकालीन मुदतीत बाजारामधील परिस्थिती फारशी चांगली नसली तरी अत्यंत चांगले रिटर्न्स मिळवून देणाऱ्या शेअरला किंवा स्टॉकला ‘मल्टिबॅगर स्टॉक’ असं म्हणतात. भारतीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना असा स्टॉक निवडायचा असेल, तर त्यासाठी सतत बदलत राहणाऱ्या मार्केटचा बारकाईने अभ्यास करण्याची आणि निर्णय घेताना सखोल विचार करण्याची गरज असते. एखादा स्टॉक ‘मल्टिबॅगर स्टॉक’ आहे, हे ओळखण्यासाठीची पाच लक्षणे कोणती, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.