ॲड. रोहित एरंडे:
आपल्याला कोणालाही त्रास न देता, सहज मरण यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, ते आपल्या हातात नसते. आजकाल उपचारपद्धती अत्याधुनिक झाल्याने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेकदा कृत्रिम जीवनप्रणाली अर्थात व्हेंटिलेटर लावला जातो. मात्र, यामुळे अनेकदा फक्त मृत्यू लांबवला जातो. असे उपचार केले जाऊ नयेत आणि मृत्यू लांबवला जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्यास ‘लिव्हिंग विल’द्वारे ती पूर्ण करता येते. त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.