कौस्तुभ केळकर:
अवैध असलेले एखादे दुकान, व्यापारी गाळा खरेदी करून त्यामध्ये व्यवसाय सुरू केला, मालाची, वस्तूंची साठवण केली, त्यांचा विमा उतरवला असेल तरीही अशी बांधकामे पाडण्यात आली किंवा नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ, जोराचा पाऊस, वादळ, पूर, भूकंप यामुळे ती पडली तर बांधकामाच्या किमतीची, तसेच दुकानातील साठवलेल्या मालाची, वस्तूंची कोणत्याची प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही. हे अतिशय महत्त्वाचे आहे. याचा सविस्तर ऊहापोह या लेखात केला आहे.