पूजा पालव
कोविड महासाथीनंतर शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये लक्षवेधी वाढ झाली आहे. याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
विशेषतः नोकरदारवर्गाचा शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. गृहिणी, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग हाही त्याला अपवाद नाही.
शेअर बाजारातून मिळणारे उत्पन्न हे तुलनात्मकरीत्या कमी कष्टाचे असले, तरी त्याचे करपरिणाम समजून घेणेही गरजेचे आहे. शेअर बाजारातील उत्पन्नावरील करआकारणी जाणून घेणे आवश्यक आहे.