१९५१ आणि १९६२ मध्ये फुटबॉलमध्ये दोन वेळा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा भारत... २०१७ मध्ये दिल्लीत १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करणारा भारत... भारतीय फुटबॉल महासंघाच्या व्हिजन डॉक्यूमेंटनुसार देशात सध्या १,४६,९०० नोंदणीकृत खेळाडू असून क्लब्सची संख्या ३,६५५ आहे... कागदोपत्री हे आकडे ‘भारी’ दिसत असले तरी भारताचे फुटबॉल वर्ल्डकपमधील ‘गोल’चे स्वप्न अजूनही पूर्ण का होऊ शकले नाही?