पुरूषोत्तम बेडेकर, psbedeker21@gmail.com
आगामी दशक हे भारताचे असणार आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक वाढीसाठी कोणते घटक पूरक असणार आहेत आणि आपल्याला गुंतवणुकीच्या संधी कशा निर्माण होणार आहेत, याकडे लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे.
एका बाजूला आपली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे, याचे समाधान आहेच; त्याचबरोबर या प्रगतीमध्ये नागरिकांचा वाढता सहभाग निश्चितपणे आश्वासक आहे. सद्य:स्थितीत इतर देशांमध्ये मंदीची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, भारत विकसित देशाचे पाहात असलेले स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी आपल्या सर्वांनाच मिळत आहे, हे विशेष!