डॉ. अजित कानिटकरआभासी जगात रमण्यापेक्षा वास्तवात आपण चार पावले जास्त चालतोय ना, याकडे सजगतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही वेळेला प्रसंगी कठोर वाटतील, असे निर्णय पालकांनी, ज्येष्ठांनी व धोरणकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. .गेल्या वर्षात व अगदी अलीकडे जागतिक संस्थांकडून डेटा वापराबद्दलची विविध आकडेवारी प्रकाशित केली गेली आहे. एरवी अशा जागतिक वृत्ताची आपण समाज म्हणून फार दखल घेत नाही, विशेषतः आपणास गैरसोयीच्या असणाऱ्या मानांकनाबद्दल जर त्यात काही नोंद असेल तर दखल न घेण्यामागे अनेक सबबींचे तर्कही आपण उभे करतो. पण अलीकडच्या एका नव्या वृत्तामुळे मात्र आपल्याला खडबडून जागे व्हावे लागेल. या वृत्ताप्रमाणे आपल्या देशाचे दरमहिना डेटा वापरण्याचे सरासरी प्रमाण ३२ जीबी आहे.दुसऱ्या एका वृत्ताप्रमाणे दर दिवशी भारतीय नागरिक सरासरी सात तास ‘सेलफोन’चा वापर करीत असतात. वरील दोन्ही बातम्या एकत्र जोडल्या तर डेटा वापराचा नवीन बकासुर कसा निर्माण झाला आहे, हे कळते. त्याची भूक कमी न होता वाढत राहिली तर अनेक नव्या प्रश्नांना जन्म देणारी आहे. हा सर्व बदल हा गेल्या पंधरा-वीस वर्षातला आहे. त्यापूर्वीची ४०-५० वर्षे म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील एकच सरकारी मालकीची यंत्रणा. जनतेला सेवा देण्यात बऱ्यापैकी दूरच! सेवापुरवठा व त्याचा दर्जा चांगला असावा, ही जनतेची माफक अपेक्षाही जेमतेमच पूर्ण होणारी. मागणी प्रचंड व पुरवठा कमी अशी अनेक वर्षे गेली. .इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा व नवीन प्रकारची स्मार्ट यंत्रे एकीकडे बाजारात येत असताना व जसे या क्षेत्राचे खासगीकरण झाले तसे सरकारी एकमेव कंपनीची असलेली बेफिकीर वृत्ती व त्यासोबतची ढिसाळ सेवा याची जागा आता ग्राहकांच्या समाधानासाठी ‘जी हुजूर’ करत अनेक सेवा सादर करीत असणाऱ्या खासगी कंपन्यांद्वारे मिळण्याची सोय झाली. आता पुरवठा प्रचंड आणि तरीही मागणीही वाढती असे काहीसे चित्र झाले आहे.सरकारी मालकीची ही सेवा जवळपास अल्पमतात आहे आणि तीनच मोठ्या खासगी उद्योगांनी हे क्षेत्र व्यापले आहे. त्यातच दहा वर्षांपूर्वी आलेल्या एका नव्या अजस्त्र उद्योगाने तर त्यात ग्राहकांना आकर्षित करणारी अनेक प्रलोभने दाखवून बाजारपेठ काबीज केली आहे. एकीकडे या सेवा पुरवणाऱ्यांच्या तांत्रिक व्यवस्था वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या ग्राहकांची ही भूकही चक्रवाढव्याजाच्या पद्धतीनेही विस्तारत आहे. सुरुवातीला जितका वापर जास्त तितकी रक्कम जास्त मोजायला लागणारा ग्राहक आता कमीत कमी रकमेत जास्त डेटा कसा मिळवायचा याच्या अनेक क्लृप्त्या शोधतो आहे. केवळ संपर्कसाधन न राहता आता ही सर्व यंत्रे दृश्य मनोरंजनाची हातामधील साधने आहेत. ‘ओटीटी’मुळे जगभरातील चित्रे आता घरबसल्या बघता येतात. आणि या नव्या नव्या मोहांमुळे ग्राहकांचा डेटा खाऊन (वापरून) टाकणारा बकासुर होतो आहे. आपण या खेळात आता जगात अगदी पहिल्या रांगेत आहोत .जन्म झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षा दोन वर्षात नवीन बालकाचे बोबडे बोल व बडबड गीते सांगणाऱ्या पालकांचे व त्याच्या आजी-आजोबांचे कोडकौतुक आता ‘आमचा बबड्याला व्हाट्सअप सुद्धा ओळखता येते आणि त्याला यूट्यूब ॲप्स लावता येते’ असे बदलले आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी -विद्यार्थिनी आता रिळाइतकेच गोल गोल गुंतले आहेत. हाताला काम नसलेली तरुणाई दिवस रात्र आभासी जगामध्ये स्वतःच्या जगण्याचे वास्तव विसरून वावरत आहे. ज्यांना नशिबाने खासगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली, त्यांनाही नोकरीपलीकडे व्यायाम, वाचन, संगीत, अन्य कलाकौशल्य, छंद याला वेळ नाही. याचे कारण दिवसरात्र तो अडकला आहे स्मार्ट मोबाईलमध्ये. मध्यम व प्रौढ वयातील अनेक व्यक्तीही या विळख्यात गुंतत चालल्या आहेत. या व्यसनाला अधीन झालेल्यांवर काय तोडगा काढायचा, याचे पुनर्वसनाचे प्रशिक्षण वर्ग व प्रशिक्षणसंस्था यांनाही आता मागणी आहे. हे सर्व भीषण वास्तव हे आपल्या सगळ्यांच्या समोर गेल्या काही वर्षातच अतिशय वेगाने उभे राहिले आहे. .वास्तव भीषण आहे, याचे कारण या व्यसनामुळे आहार, विहार, निद्रा, मित्र-समुदाय, समाजभान, सारासार विचार करण्याची वृत्ती आणि साधी- सोपी दैनंदिन कौशल्येही हळूहळू विसरत चालली आहेत. कोपऱ्यावरच्या दुकानदाराला तीन वस्तू घेतल्यानंतर बेरीज मोबाईलवर बटणे वापरल्याशिवाय तोंडी गणिताने आता करता येत नाहीत. शाळांमधील विद्यार्थ्यांना पाढे पाठ नाहीत, त्यांना मोबाईलची गरज भासते. पूर्वी डेटा नसताना शंभर दोनशे मित्र परिचितांचे दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ असलेल्यांना स्वतःच्या पत्नीचा अथवा पतीचाही क्रमांक आता दुसऱ्या कोणाकडून तरी विचारून घ्यावा लागतो. नव्या शहरातील पत्ता, दुकानांची नावे, आजूबाजूला असलेली झाडे, दुकानातील दरवळणारे गंध या सर्वांना टिपणारे शब्द, स्पर्श, गंध, नाद या गोष्टी जाऊन एका कोणत्यातरी नकाशावरच्या दिशादर्शक बाणावरून ठरते आहे. स्मार्ट यंत्रे हळूहळू बुद्धी मंद करणारी ठरत आहेत. .अवधान-समय घटलाया सर्व तंत्रज्ञानामधील योग्य वापर व अतिरेकी वापर यामधील सीमारेषाही पुसट होत आहे. पूर्वीच्या काळी अष्टावधानी असे म्हणण्याची प्रथा होती. आता दुर्दैवाने सर्वच जण अनवधानी होताना दिसताहेत.व्यक्तीचे ऐकताना- बघताना २५ सेकंदांहून जास्त अवधान राहत नाही, असे एका संशोधनात आढळले. या नव्या अर्थव्यवस्थेचे वर्णन आणखी एका व्यक्तीने ‘अटेंशन इकॉनॉमी’ असे केले आहे. म्हणजे तुम्ही जितका कमाल वेळ लक्ष वेधून घेऊ शकाल, तितक्या कमी वेळात तुमचे म्हणणे पोचले पाहिजे.या उथळ, तात्पुरत्या व क्षणिक आभासी विश्वामुळे प्रत्यक्ष वास्तवात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. त्यामुळेच खोट्या बातम्या, खोटी चित्रे, खोटी छायाचित्रे- व्हिडिओज यांचा सुकाळ झाला आहे आणि भलेभले त्या जाळ्यात अडकताहेत.तरतमभाव, नीरक्षीरविवेक, चांगले आणि वाईट काय यामध्ये तर्कसंगतीने मूल्यमापन करणे, ही मूलभूत मानवी कौशल्येही मागे पडून त्याची जागा आभासी माध्यमातून प्रचार करणाऱ्या साधनांनी घेतली आहे. हे सर्व शक्य होते आहे, ते या यंत्रणा पुरवठा करणाऱ्या ‘डेटा’ नावाच्या बकासुराच्या भुकेमुळे. या भस्मासुरांबद्दल सावध राहणे, आपल्या स्वतःच्या संपर्क साधनाचा वापर नियंत्रित ठेवणे, आभासी जगापलीकडे जाऊन मित्रमंडळाचे वर्तुळ, वाचन, हाताने करण्याचे काम, व्यायाम, अन्य छंद हे आपण योग्य वेळ देऊन करतोय ना, याची सतत आठवण ठेवणे, आभासी जगात रमण्यापेक्षा वास्तवातच चार पावले जास्त चालतोय ना याकडे सजगतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही वेळेला प्रसंगी कठोर वाटतील, असे निर्णय पालकांनी, ज्येष्ठांनी व धोरणकर्त्यानी घेण्याची आवश्यकता आहे. एका ग्रामपंचायतीने संध्याकाळचे तीन तास गावांमध्ये सेलफोन व टीव्ही बंद असा स्वयंशासनाचा निर्णय घेतला होता. त्या तीन तासांमध्ये गावानेच ठराव करून कोणत्याही प्रकारच्या या संपर्क साधनांपासून कटाक्षाने दूर राहायचे ठरवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुधारला, असे त्यांचे निरीक्षण होते. अशाप्रकारची म्हटली तर अवघड; पण नवीन उत्तरे आपल्याला शोधावी लागतील.( लेखक आर्थिक, सामाजिक व विकासविषयक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)--------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.