सध्या भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांचे संबंध काही फारसे बरे नाहीत. गेल्या वर्षी कॅनडामध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाचा (ज्याला भारताने अतिरेकी म्हणून घोषीत केलं होतं) मृत्यू झाल्यानंतर तर हे संबंध आणखीच बिघडलेत. त्यातच २०२४मध्ये कॅनडाने बाहेरच्या विद्यार्थ्यांना व्हिसा देताना अनेक नवे नियम लावले.
कॅनडा सरकारने २०२३ च्या तुलनेत २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला. ही कपात तब्बल ३५ टक्के आहे. त्यामुळे २०२४ या वर्षासाठी कॅनडा सरकारकडून केवळ तीन लाख ६० हजार परदेशी विद्यार्थ्यांनाच व्हिसा मिळू शकतो आहे. पुढच्या वर्षीसाठीसुद्धा हे प्रमाण असंच कमी असण्याची शक्यता आहे.