''Vishy's Children''; महान बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पारोव्हा यांनी भारताच्या यंग ब्रिगेडने ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक जिंकल्यानंतर काढलेले पहिले उद्गार. विश्वनाथन आनंदने भारताला जागतील बुद्धिबळाच्या पटलावरील 'King' बनवले, परंतु ऑलिम्पियाड स्पर्धेत त्यालाही यशाने हुकवालणी दिली होती. १९५५ पासून सुरू झालेल्या भारताच्या ऑलिम्पियाड स्पर्धेतील प्रवासाला मागील ४ वर्षांत कुठे यश मिळताना दिसतेय. २०२२ मध्ये दोन संघांच्या सहभागामुळे भारताचे युवा खेळाडू जगासमोर आले आणि २०२४ मध्ये त्याच खेळाडूंनी ऐतिहासिक दोन सुवर्णपदक जिंकले. डी गुकेश ( Gukesh Dommaraju), प्रज्ञानंदा, अर्जुन एरिगैसी, विदीत गुजराती व पेंटाला हरिकृष्णा यांनी खुल्या गटात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. महिला गटातील सुवर्णपदकात हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल व तानिया सचदेव यांची खूप मोठा वाटा उचलला...