India’s Sports Industry is Set to Grow: आजची पिढी मैदानावर कमी अन् गॅजेट्समध्ये अधिक दिसते, असा सूर अनेकांचा आहे. पण, तंत्रज्ञानाच्या विश्वात वाढलेली आणि रमलेली पिढी भारताच्या क्रीडा उद्योगाला पुढील ७-८ वर्षांत मोठी भरारी मिळवून देणार आहे. मागील काही वर्षांत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी अनेक खेळांच्या लीग आल्या आणि त्यातून करिअरसाठी नवीन दारं उघडली. त्यातून क्रीडा उद्योगाला चालनाही मिळाली आहे आणि २०२३ मध्ये भारतातील क्रीडा उद्योग ५२ बिलियन डॉलर अर्थात ४,३९१ अब्ज वाढले आहे आणि २०३० पर्यंत हा आकडा १३० बिलियन डॉलर म्हणजेच दुप्पटीने वाढणार असल्याचा अंदाज Deloitte-Google च्या अहवालातून समोर आला आहे. भारतीय रक्कमेत हा आकडा १०,९७७ अब्जापर्यंत जातोय...