प्रो कबड्डीचा ११ वा सिजन आता १८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी आता खेळाडूही जोरदार तयारीला लागलेत. यंदाच्या सिजनमध्येही काही स्टार खेळाडूंवर तर सर्वांचे लक्ष असणार आहेच, पण त्याचबरोबर काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही हंगामात आपली प्रतिभा सिद्ध केलीये. यामध्ये २८ वर्षीय मनजीत दहीयाचाही समावेश आहे. मनजीत एक चांगला रेडर ( चढाईपटू) तर आहेच, पण गरज पडल्याच तो चांगला बचावही करू शकतो. आर्मी ते प्रो-कबड्डी असा मनजीतचा प्रवास आहे. आता तो यू मुम्बाकडून ११ सिजनमध्ये खेळणार आहे. त्याच्या या प्रवासाबाबत त्याने सकाळशी संवाद साधला.