अनिल पी. एम.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI-इर्डा) सर्वांत उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक म्हणजे डिजिटायझेशनसाठी प्रयत्न.
यामुळेच प्रादेशिक बाजारपेठांमध्ये विम्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला. विमा कंपन्यांना नवी उत्पादने विकसित करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यातही या ‘इर्डा’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
अगदी अलीकडे, ‘इर्डा’ने पॉलिसीधारकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी फायदा मिळवून देण्यासाठी नियामक सुधारणांची घोषणा केली. या नव्या नियामक बदलांची माहिती घेणे विमा ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे.