कोल्हापूरात दंगल झाली, इंटरनेट बंद पडलं आणि अनेक वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदारांची, व्यावसायिकांची पंचाईत झाली.
रोहन पाटील हे कोल्हापूरस्थित आयटी अभियंता आहेत. कोल्हापूरात इंटरनेट बंद पडल्यावर रोहनसारख्या इतर अनेक आयटी तंत्रज्ञ, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचं काम ठप्प झालं.
इंटरनेट सेवा बंद असणार असे कळल्यावर आपला कामाचे दिवस बुडू नयेच, म्हणून प्रत्येकजणच काळजीत पडला.
अर्थात यावरही त्यांनी उपाय शोधला. तब्बल ३१ तास नेट बंद असल्याचं कळल्यावर अनेकांनी कोल्हापूरजवळच्या सीमा भागात अथवा जवळच्या सांगली, कोगनोळी, चिक्कोडी भागात जाऊन दिवसभर ऑनलाईन काम केले. (kolhapur riot internet shutdown)