भारताचं सर्वांत अनोखं वैशिष्ट्य कोणतं? या प्रश्नावर अगदी सहज उत्तर येतं- इथली विविधता! मग ते सांस्कृतिक असो अथवा भौगोलिक. विशेष म्हणजे भारताचं हेच वैविध्य आज देशाच्या आर्थिक वृद्धीला प्रचंड प्रमाणात हातभार लावत आहे, इतकंच नाही तर वैश्विक बाजारपेठेचा विचार केला तर आगामी दशक हे फक्त भारताचं असेल. हे मत आहे रिझर्व्ह बॅंकेचे संचालक आणि ‘सहकार भारती’चे संस्थापक सतीश मराठे यांचं! जागतिक अर्थस्थिती आणि भारताचा आर्थिक प्रवास या अनुषंगानं येणाऱ्या विविध मुद्द्यांवर सतीश मराठे यांची ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले आणि ज्येष्ठ लेखक सुधाकर कुलकर्णी यांनी घेतलेली खास मुलाखत.