किरांग गांधी
आपण केलेल्या गुंतवणुकीला ठराविक काळात किती परतावा मिळाला हे समजून घेण्यासाठी चक्रवाढीच्या वार्षिक दराच्या अर्थात ‘सीएजीआर’चा वापर केला जातो.
भारतात आर्थिक धोरणे, जागतिक ट्रेंड आणि देशांतर्गत वापराच्या पद्धतींसह बाजारातील चढ-उतार हे विविध घटकांनी प्रभावित आहेत. त्यामुळे उत्तम ‘सीएजीआर’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी धोरणात्मक दूरदृष्टी आणि जोखीम व्यवस्थापन यांचे योग्य मिश्रण आवश्यक आहे.