जुई गडकरी, अभिनेत्री
माझ्यासाठी आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या वाईट काळासाठी बचत करा, गुंतवणूक करा. कारण सगळ्या गोष्टी खूप अनपेक्षित असतात. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करणं कधीही चांगलं. त्यामुळे आपण जे काही कमवू त्यातून जवळपास ८० टक्के बचत करावी, हे मी शिकले आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते आर्थिक नियोजन आहे.
मी खूप लहानपणापासून आर्थिक नियोजन करते. मी दुसरीत असल्यापासून कमवायला लागले. मी स्टेज शो करायचे, गायचे, तेव्हा मला ७०० ते ८०० रुपये मिळायचे. माझा गल्ला होता, त्याच्यामध्ये मी ते ठेवायचे.
माझ्या आयुष्यात मी घेतलेली पहिली मोठी बाहुली मी याच पैशांमधून घेतली होती. तेव्हापासून मी शिकले, की आपण जे कमावतो, ते पैसे असे साठवायचे. मला पैसे साठवायला आवडतं. त्यामुळे मी तेव्हापासून पैसे साठवणे सुरू केलं.