डॉ. वीरेंद्र ताटके
गणेशोत्सवाला सगळीकडे उत्साहाने सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य, आकर्षक आणि रेखीव गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.
अनिकेत आणि त्याच्या मित्रमंडळींनीसुद्धा मोठी आणि सुंदर मूर्ती आणली आहे. बाप्पांची अशी सुंदर आणि भव्य मूर्ती पाहिली, की बाप्पा आपल्याला त्यातून काहीतरी शिकवत आहेत, असंच सारखं वाटतं.
बाप्पांची मूर्ती आपल्याला आर्थिक नियोजनाचे आणि गुंतवणुकीचेसुद्धा धडे देत असते. हो! अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही...! त्याबद्दलच जाणून घेऊ या वेळच्या ‘इन्व्हेस्टमेंट क्लासरूम’मध्ये!