विक्रम अवसरीकर, फायनान्शिअल प्लॅनर
असा कोणताही विचार करू नकोस!’’ धनंजयरावांनी छोटूच्या देहबोलीकडे बघत म्हटले.
‘‘मी कोणता विचार करत आहे, हे तुम्हाला काय माहिती?’’ छोटूने विचारले.
‘‘बंदची माहिती मिळाल्यावर आता बँकेत पैसे ठेवण्याऐवजी बॉँडच्या इंटरेस्टवर खेळ करून पैसे कमावू, असा विचार!’’ धनंजयरावांनी छोटूला पकडले होते.
‘‘मी असाच काहीसा विचार करत होतो, हे खरे आहे; पण तितक्यात तुम्ही जे म्हणाला होतात त्याची आठवण झाली.’’ छोटूने चक्क वाद न घालता त्यांचे म्हणणे मान्य केले.
‘‘मी काय म्हणालो होतो?’’ धनंजयरावांनी आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायचेच ठरवले होते.
‘‘कोणतीही गुंतवणूक करताना नेहमी आपल्याला ती कितपत उपयोगी आहे, आपल्या आधीच्या गुंतवणुकीबरोबर नव्या गुंतवणुकीचे नाते काय असेल, नवी गुंतवणूक करताना एकंदरीत किती जोखीम पत्करायची ते ठरवून कायम दूरवरचा विचार केला पाहिजे. गुंतवणूक करणे हा अतिशय रटाळ खेळ असला तरी अशा प्रकारे गुंतवणूक केली, तर मिळणारे फळ रसाळ असण्याची शक्यता जास्तीत जास्त असते...’’