अमित मोडक,
ceo.pngs@gmail.com
सोने व चांदी हे दोन मौल्यवान धातू भारतीयांच्या जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे यामध्ये झालेली वाढ किंवा घसरण याबाबत कायमच औत्सुक्य असते.
काही कारणांमुळे यामध्ये सातत्याने बदल होण्यास सुरुवात झाल्यावर हे धातू भारतीयांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरतात. मग त्या कौटुंबिक पातळीवर असतील किंवा समूहात... पण त्यावर चर्चा होतेच.
गेल्या काही वर्षांपासून सोने आणि चांदी या धातूंबाबत सातत्याने आपल्याला नव्या घडामोडी ऐकायला मिळाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात भारतापुरते बोलायचे झाले, तर केंद्र सरकारने सोन्यावरील आयातशुल्क कपात करून ग्राहकांना एक धक्का दिला होता.
पण, आयातशुल्कात केलेल्या कपातीचा गोडवा किती दिवस कायम राहणार आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. ऑगस्टपासून सोने व चांदीवर परिणाम करणाऱ्या घडामोडी जागतिक पातळीवर सातत्याने घडल्या आहेत. त्याचे पडसाद या धातूंच्या मूल्यावर उमटले असून, या धातूंमध्ये तेजी आहे.