सुशील जाधव,
sushiljadhav@yahoo.co.in
प्रत्येक जण एका उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असतो. उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञान आणि कष्टासोबतच हवी आर्थिक सुबत्ता. ही आर्थिक संपन्नता निश्चितच योग्य वयात केलेल्या चांगल्या गुंतवणुकीमधून येते.
त्यासाठी योग्य वयात, वेळेत व योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूकच फलदायी ठरते. भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक आवश्यकच असते.
मात्र, त्याचा फायदा तेव्हाच मिळेल, जेव्हा तुमच्यासमोर एक आर्थिक उद्दिष्ट असेल, भविष्यातील योजनांविषयी तुमची स्पष्टता असेल वा त्यासाठी योग्य नियोजन केलेले असेल.