जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCI ने शनिवारी एकामागून एक मास्टरस्ट्रोक मारले, असा दावा केला जातोय. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयने काही नियम जाहीर केले. त्यानुसार २०२५ ते २०२७ मध्ये होणाऱ्या लिलावात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. सचिव जय शाह यांनी तर आता प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येणाऱ्या प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूला ७.५ लाख रुपये मॅच फी देणार असल्याचे जाहीर केले. म्हणजे समजा एखाद्या खेळाडूला २० कोटींत फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात घेतले आणि तो आयपीएल २०२५ मध्ये सर्व १४ सामने खेळला तर त्याला त्या २० कोटींव्यतिरिक्त प्रती सामना ७.५ लाख रुपयेही मिळतील. पण, त्याचवेळी बीसीआयने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत, त्या जाणून घेणं गरजेचं आहेत.