IPL Retention Insider: पगारवाढीसाठी कर्णधारांचा राजीनामा; पण, युवा खेळाडूंना मिळाली बम्पर Hike, ६९००% झाली वाढ

IPL 2025 retentions काल सर्व संघांनी त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली आणि त्यातून बरेच मुद्दे हे अजूनही दुर्लक्षित आहेत. ऑगस्टमध्ये BCCI ने जेव्हा सर्व फ्रँचायझी मालकांची बैठक बोलावली, त्यात मेगा ऑक्शनला अनेक फ्रँचायझींचा विरोधच होता.
IPL 2025 retentions
IPL 2025 retentionsesakal
Updated on

IPL 2025 retain players list, IPL 2025 players released: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी अखेर १० फ्रँचायझींनी त्यांची रिटेन्शन म्हणजेच संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची मनधरणी करण्यात यश आले, त्याचवेळी त्यांनी पगारवाढीचा योग्य ताळमेळ आखून सर्वांना खूश केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विराट कोहलीला कायम राखणार हे सर्वांनाच माहित होते, परंतु त्यासाठी ते २१ कोटी मोजतील याची कल्पना नक्कीच कुणी केली नसावी. आयपीएल इतिहासात २१ कोटी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबादने सर्वांना आश्चर्याचा धक्का देताना हेनरिच क्लासेनसाठी तब्बल २३ कोटी मोजले. SRH च्या या खेळीने अन्य संघातील प्रमुख खेळाडूंना आपल्यालाही चांगली पगारवाढ मिळेल असे स्वप्न पडू लागले. त्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या, परंतु व्यावसायिक असलेले फ्रँचायझी मालक इतक्या सहजतेने खिसा रिकामा करण्यातले नव्हते. त्यामुळेच रिटेन्शनमध्ये पाच संघांनी त्यांच्या कर्णधारालाच बाहेर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.