नीलेश साठे
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे ‘आयआरडीए’ने १९ जून २०२४ रोजी एका परिपत्रकाद्वारे विमा कंपन्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अंकुश लावला आहे.
विशेषतः युलिप या विमा प्रकाराच्या जाहिरातीवरून ही म्युच्युअल फंडाची योजना वाटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश ‘आयआरडीए’ने विमा कंपन्यांना दिले आहेत.
यानिमित्ताने ‘आयआरडीए’ने उचललेले हे ग्राहकाभिमुख पाऊल स्वागतार्ह आहे. तक्रार निवारणासाठी लोकपाल यंत्रणेसारखी व्यवस्था कंपनीत हवी.
कमीत कमी कालावधीत तक्रार निवारण व्हायला हवे. तक्रार निवारणात आधुनिक तंत्राचा वापर करावा, अशा अनेक सूचना ‘आयआरडीए’ने केल्या आहेत.